निफाडला दिव्यांग विद्यार्थ्यांना TLM साहित्य वाटप

निफाड पंचायत समितीतर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप करताना गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी विलास साळी आदी.

 

निफाड/प्रतिनिधी

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त निफाड पंचायत समिती तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना TLM साहित्य पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी विलास साळी यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थांचा निफाड पंचायत समितीच्या प्रशासनाने पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.
सदर साहित्य वाटप करण्यासाठी आयडी समन्वयक मुकेश जगताप, विशेष शिक्षक दौलत जामकर, विजया अवचार,अर्चना राणे , स्नेहल गीते, शिला मोरे, रेणुका घोटेकर , वनिता मंडलिक,विषय तज्ञ विजय खालकर ,आत्माराम न्याहारकर , प्रमोद चव्हाण , साळुंखे आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply